

Pune PMC's Smart Microchip Project
Sakal
पुणे : शहरातील भटक्या श्वानांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी. त्यामध्ये त्यांचा रंग, लिंग या शारीरिक माहितीसह तो राहतो ते ठिकाण, प्रवास, लसीकरण आदी माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या श्वानांच्या शरीरात स्मार्ट मायक्रो चिप बसविण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. त्याअंतर्गत सुरुवातीला ६०० श्वानांना ही चिप बसविण्यात येणार असून, त्यापैकी आतापर्यंत १५ श्वानांना त्या बसविण्यात आल्या आहेत.