

PMC Initiates Release of Pending Swachh Subsidies
Sakal
पुणे : ‘स्वच्छ’च्या कचरावेचकांना दिले जाणारे वस्ती अनुदान (स्लम सबसिडी) ऐन सणासुदीच्या काळात महापालिकेने सहा महिन्यांपासून प्रलंबित ठेवले होते. आता अनुदान देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापुढे तिमाहीऐवजी दरमहा अनुदान कसे देता येईल, यासंदर्भात प्रशासनाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.