
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-तळेगाव मार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. पीएमपीएल बसने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पीएमपीएल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातातील मृतांचे नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र असल्याची माहिती समजते. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.