

Pune E-Bus Project
sakal
प्रसाद कानडे
पुणे : राज्य सरकारने ‘पीएम ई-ड्राइव्ह’अंतर्गत ‘पीएमपी’ला देण्यात येणाऱ्या एक हजार ‘ई-बस’साठी रिझर्व्ह बँकेला हमी दिली आहे. हमी मिळाल्याने अवजड उद्योग मंत्रालयाने ‘पीएमपी’ला पहिल्या टप्प्यात १२ मीटर लांबीच्या ८०० व ९ मीटर लांबीच्या २०० अशा मिळून एक हजार ‘ई-बस’ देण्याचे मान्य केले आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ‘पीएमपी’ला एक हजार ‘ई-बस’ मिळणार असल्याने सुमारे ८ ते १० लाख प्रवाशांची सोय होणार आहे.