

PMPML Senior Citizen Concession Pune Announces Half Price Bus Tickets from November 1 for Daily and Short Distance Travel
sakal
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येणार आहे. दैनिक पासनंतर आता तिकीट दरातदेखील ज्येष्ठांना सवलत देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून, यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.