

PMPML Bus Hijacker Admitted to Sassoon Hospital for Psychiatric Evaluation
sakal
पुणे : डेंगळे पुलावरून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस भरदिवसा पळविणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असून त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर मानसोपचार विभागात उपचार सूरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.