Pune Crime : पीएमपी बसमध्ये चढताना कटरने कापून सोन्याची बांगडी लंपास; कोथरूड बसस्थानकावर ज्येष्ठ महिलेची फसवणूक
Gold Bangle Worth ₹90,000 Stolen at PMPML Bus Stop : पुण्यातील कोथरूड येथील धोंडिबा सुतार बसस्थानकात पीएमपी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कटरच्या साहाय्याने चोरट्याने ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हातातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Gold Bangle Worth ₹90,000 Stolen at PMPML Bus Stop
पुणे : पीएमपी बसमध्ये चढत असताना चोरट्याने ज्येष्ठ महिला प्रवाशाची ९० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास केली. ही घटना रविवारी कोथरूडमधील धोंडिबा सुतार बसस्थानकात घडली.