

PMPML Fleet to Double with 2,000 New Buses
Sakal
पुणे : पीएमपीच्या ताफ्यात येत्या चार ते पाच महिन्यांत दोन हजार नवीन बस दाखल होणार आहेत. सद्य:स्थितीत असलेल्या दोन हजार बसची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात एकूण बसची संख्या चार हजार होणार आहे. बसची संख्या वाढणार असल्याने पीएमपी प्रशासनाने प्रवासीसंख्या जवळपास दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. पीएमपीची दैनंदिन प्रवासीसंख्या २० लाख होईल, या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे.