पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या ई-बसद्वारे नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा

वाघोली येथील चौथ्या ई-बस आगाराचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune PMPML Pollution free ebus service
Pune PMPML Pollution free ebus servicesakal

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा दिली जात आहे. ई-बसद्वारे नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्या वतीने आयोजित सिंहगड ई-बस सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस संचलन मैदानावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाघोली येथील चौथ्या ई-बस आगाराचे तसेच ‘माझा सिंहगड माझा अभिमान’ योजनेअंतर्गत ई-बस सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली. पीएमपीएमएलच्या ई-बसद्वारे शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहित सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

पर्यावरण पूरक पिशव्या निर्मिती करण्यासाठी सदिच्छा महिला बचत गटाच्या मनीषा पायगुडे आणि सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या अलका पडवळ यांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले.

मार्गदर्शिकेचे प्रकाशन

पवार यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह आणि योजनांची माहिती मिळणार आहे.

जातीय सलोखा जपावा

राज्यात जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आपल्या बोलण्यातून, कृतीतून इतरांच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com