esakal | पुणे : पीएमपीची रोजची प्रवासी संख्या पाच लाखांपार!
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML Bus

पुणे : पीएमपीची रोजची प्रवासी संख्या पाच लाखांपार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि पिंपरी चिंचवड अनलॉक झाल्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन प्रवासी संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून उत्पन्नही एक कोटींपर्यंत पोचले आहे.

कोरोनाचे निर्बंध दोन्ही महापालिकांनी टप्याटप्याने शिथिल केले आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांत तसेच जिल्ह्याच्या काही भागातील पीएमपीच्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यात विशेषतः नोकरदार, व्यावसायिक आणि विक्रेत्या प्रवाशांचा सहभाग लक्षणीय आहे. शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या फारशी वाढलेली नाही. प्रवासी संख्या वाढू लागल्याने पीएमपीने १६ सप्टेंबरपासून ११०० ऐवजी १४०० बस दोन्ही शहरांतील मार्गांवर आणल्या. त्यामुळे थांब्यावर बसची वाट पाहण्याचा प्रवाशांचा वेळ कमी होऊ लागला आहे. सध्या दोन्ही शहरांतील सुमारे पाच लाख ६० हजार प्रवासी पीएमपीच्या बसचा वापर करीत आहेत. तसेच उत्पन्नही गेल्या सहा दिवसांत ९० ते ९८ लाख रुपये प्रतिदिन झाले आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी दिली.

कोरोनाची भीती अजूनही असल्यामुळे मास्कशिवाय प्रवाशांना प्रवास करून दिला जात नाही. तसेच, बसमध्ये प्रवाशांची गर्दी होणार नाही, या बाबत दक्षता घेण्याचा आदेश वाहक-चालकांना देण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागापेक्षा उपनगरांतून आणि जिल्ह्यांतील प्रवाशांची संख्या वाढती असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

loading image
go to top