

PMRDA's Gunthewari Deadline Ends
Sakal
पुणे : गुंठेवारी कायद्यांतर्गत बांधकामे नियमित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे. या मुदतीत केवळ दोनशेच प्रस्ताव प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी दाखल झाले आहेत. चार वेळा मुदतवाढ आणि शुल्कात सवलत देऊनही घरे नियमितीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे.