Pune: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा, वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई

Latest Marathi News | अन्यथा अवैध केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल
Pune: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा, वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई
Pune sakal
Updated on

Latest Vadgaon News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ('पीएमआरडीए') कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकत धारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अन्यथा अवैध केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. असा इशारा अनधिकृत बांधकाम विभागाचे तहसीलदार बजरंग चौगुले यांनी दिला आहे.

मुंबई - बंगळूर महामार्गावरील सेवा रस्त्याला वाहतुकीस अडथळा करणाऱ्या नऱ्हे (ता. हवेली ) हद्दीतील बांधकामावर गुरूवारी (ता. १) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई केली. यावेळी तहसीलदार बजरंग चौगुले 'सकाळ'शी बोलताना हि माहिती दिली.

Pune: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा, वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई
Pune Crime : माळेगावात प्रमोद जाधव यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा

यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व अनधिकृत बांधकाम विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, तहसीलदार बजरंग चौगुले, तहसीलदार मनीषा तेलभाते, कनिष्ठ अभियंता धनंजय झालटे, सिंहगड रोड वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे व पीएमआरडीएचे अधिकारी आणि कर्मचारी आदीनी ही कारवाई केली आहे.

यापुढे बोलताना बजरंग चौगुले म्हणाले, "यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र केली जाणार असून नागरिकांनी विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, नऱ्हे (ता. हवेली ) हद्दीतील नवले पूल ते भूमकर चौकापर्यंत १३४४७ चौ. फूट अनाधिकृत बांधकामे वाहतुकीस अडथळा करणारी दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

Pune: अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा, वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई
Pune Fraud News : जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार महिलेची फसवणूक: पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com