

Pune's Population to Hit Two Crore by 2050
Sakal
पुणे : ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील लोकसंख्या २०५० पर्यंत दोन कोटी होणार आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, शहराची वाढही तितक्याच गतीने होत आहे. त्यामुळे शहराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायचा असेल, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील,’’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले.