

ganja smuggling
sakal
पुणे - शहरात अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली. एसआरपीफ मैदानाच्या परिसरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईत मुख्य विक्रेत्यासह पुरवठा करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून एक किलो ४४ ग्रॅम गांजा, एक मोटार असा सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.