जबरी चोरी, वाहनचोरीतील सुलतान पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पादचाऱ्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेणे, दुचाकी वाहने चोरने, अशा चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
जबरी चोरी व वाहनचोरीतील "सुलतान' समर्थ पोलिसांच्या जाळ्यात
जबरी चोरी व वाहनचोरीतील "सुलतान' समर्थ पोलिसांच्या जाळ्यातesakal
Updated on

पुणे : पादचाऱ्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेणे, दुचाकी वाहने चोरने, अशा चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी व मोबाईल जप्त केले. सुलतान शेख (वय 19, रा.येरवडा) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिसांचे पथक स्वातंत्र्यदिनी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी नाना पेठेतील आझाद आळीमध्ये एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्याकडील मोबाईल नाना पेठ येथून चोरल्याची कबुली दिली.

जबरी चोरी व वाहनचोरीतील "सुलतान' समर्थ पोलिसांच्या जाळ्यात
पुण्यात बसथांबा कोसळला; तीन प्रवासी जखमी

त्याच्याबाबतचा समर्थ पोलिस ठाण्याकडील अभिलेख पडताळून पाहिल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोबाईल व वाहनचोरीचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. तसेच त्याने दिड महिन्यांपूर्वी गणेश पेठ येथून एक महागडी दुचाकी चोरली होती, याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्याने दोन दिवसांपूर्वी सासवड येथून पार्कींगमधून दुचाकी व नायडू रुग्णालयाजवळून मोबाईलची चोरी केली होती.

जबरी चोरी व वाहनचोरीतील "सुलतान' समर्थ पोलिसांच्या जाळ्यात
पुणे: खडकी-बालेवाडीत नव्या मार्गांवर पीएमपी

त्याच्याकडे चोरीचे आणखी तीन मोबाईल आढळून आले. मोबाईलच्या मालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलिस कर्मचारी जितेंद्र पवार, धीरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.