
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एका ज्वेलरी शॉपमध्ये दरोड्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकातून एका इंजिनिअरला अटक केलीय. इंजिनिअर कॉलेजमध्ये टॉपर असणाऱ्या २१ वर्षीय तरुणानं पुण्यात येऊन चोरीचा प्लॅन आखला. त्यानं चोरीही केली पण पोलिसांनी त्याचा माग काढत कर्नाटकातून अटक केली. त्यानं चोरी केलेलं सोनं ५ लाख रुपये किंमतीचं असलं तरी ते दागिने फॉर्मिंग केलेले एक ग्रॅमचे होते.