

Pune Crime News Two Men Arrested With Pistol and Live Cartridges in Ektanagari Area by Sinhagad Road Police Team
esakal
सिंहगड रस्ता : एकतानगरी परिसरात सापळा रचून सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. सूर्यराज मनोज निंबाळकर (वय २०, रा. गोकुळनगर, नऱ्हे) आणि गौरव राजू घाडगे (वय २०, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.