घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग घेणाऱ्या 31 जणांना अटक; पुणे पोलिसांची धडक कारवाई

Horse_Races
Horse_Races
Updated on

पुणे : घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीरपणे बेटिंग घेणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी केलेल्या विशेष कावाईत बेड्या ठोकल्या. वानवडी, कोंढवा व हडपसर पसिरात एकाच वेळी केलेल्या या कारवाईमध्ये बेकायदेशीर बेटींग करणारे मोठे बुकीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर विविध पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम असा साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रेसकोर्स येथे होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीवर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे ऑनलाईन पद्धतीने व फोनद्वारे सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी वेगवेगळी पथके तयार केली. या पथकांकडून शुक्रवारी रात्री वानवडी, कोंढवा व हडपसर परिसरातील बुकींच्या ठिकाणांवर छापे घालण्यात आले.

डोबरवाडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळच्या मोकळ्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे बेटिंग घेण्यात येत होते. तेथे छापा टाकून पोलिसांनी 20 जणांना अटक केली. वानवडीतील नॅन्सी टॉवर येथील छाप्यामध्ये मुशील सुलतान बरेलवी यास पोलिसांनी अटक वानवडीतील पद्मविला सोसायटी परिसरात झालेल्या कारवाईमध्ये शब्बीर मोहसीन खंबाटी यास पोलिसांनी अटक केली. तेथून 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अन्य ठिकाणाहून 31 मोबाईल, 6 लॅपटॉप व रोख रक्कम असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सराव करणाऱ्या घोड्यांवरच बेटींग
रेसकोर्समध्ये घोड्यांच्या शर्यतीसाठी रेसकोर्सच्या परिसरातच अधिकृत बेटींग करण्यास कायदेशीरीत्या परवानगी आहे. परंतु या रेसकोर्स परिसर वगळता अन्य ठिकाणी बेटींग करता येत नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सध्या रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यती बंद आहेत. परंतु घोड्यांना शर्यतीचा सराव करता यावा, यासाठी घोडे सरावासाठी पळविले जातात. दरम्यान, आरोपींनी संबंधीत नियमांचे उल्लंघन करीत रेसकोर्सच्या बाहेर सराव करणाऱ्या घोड्यांवरच बेटींग घेण्याचा प्रकार सुरू होता. अशा ठिकाणांवर छापे टाकून पोलिसांनी आरोपींना अटक केली. या बेकायदेशीर बेटींगसाठी आरोपींनी मोबाईल ऍपही तयार केले होते.

"कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर घोड्यांच्या शर्यती सध्या बंद आहेत. परंतु त्यांचा नियमीत सराव सुरू आहे. याच सरावासाठी धावणाऱ्या घोड्यांवर बेकायदेशीरपणे बेटींग सुरू होते. रेसकोर्सच्या बाहेर बेटींग घेणे नियामनुसार बेकायदेशीर आहे. त्यादृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.''
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fire Breaks Out in Running PMPML Bus in Pune
Eleven Illegal PG Hostels Sealed in Lohegaon by PMC
Inauguration of the 38th Pune Festival by Vice President C.P. Radhakrishnan
Kasba Ganpati Installed in Houston, Texas for Golden Jubilee
Marathi News Esakal
www.esakal.com