
विधानसभेसाठी किती जागा लढवायच्या हेच वेळेत न ठरल्याने जेडीयूवर ही वेळ आल्याचे नितीशकुमारांनीही मान्य केले.
पटना : बिहारमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचाच पाढा आज त्यांनी नितीशकुमारांपुढे वाचून दाखवला. भाजपने सहकार्य न केल्याने आणि कटामुळेच हे घडले आहे, असं त्यांनी एका सुरात सांगून टाकले. पटना येथे जेडीयूची राज्य परिषद आणि पार्टी पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जेडीयू नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर भाजपवर फोडले.
- निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा
या बैठकीत एका पाठोपाठ एक माजी आमदारांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. चिराग पासवान हे तर फक्त मोहरा होते, पण पडद्यामागे चालणारा सगळा खेळ भाजपचा होता. मतदार आणि कार्यकर्त्यांचे कोणतेच सहकार्य या निवडणुकीत मिळाले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. एनआरसी बाबत जेडीयूची भूमिका आणि भाजपच्या माजी मंत्र्याने केलेल्या वक्तव्यामुळे सीमांचल भागातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका जेडीयूला बसला, असेही त्यांनी म्हटले आहे.
- बेदी यू गो ! राज्यपाल किरण बेदींविरोधात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन
विधानसभेसाठी किती जागा लढवायच्या हेच वेळेत न ठरल्याने जेडीयूवर ही वेळ आल्याचे नितीशकुमारांनीही मान्य केले. प्रत्यक्ष मैदानात चित्र वेगळेच होते आणि आपल्याला दिसणारे वेगळेच होते, हे प्रचार करून आल्यानंतर जाणवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या सरकारची चुकीची प्रतीमा सोशल मीडियावर उभी करण्यात आल्याबाबत त्यांनी सोशल मीडियाला दोष दिला. भाजप आणि इतर सहकाऱ्यांच्या दबावात येऊन मी शपथ घेतली, माझी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
- CM खट्टर यांच्या विरोधात बळीराजा रस्त्यावर; पोलिसांकडून लाठीचार्ज अश्रूधूर अन् पाण्याचा मारा
दुसरीकडे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी काहीजणांनी मतदारांची दिशाभूल करण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. कोरोना काळात जेवढं काम बिहार सरकारने केलं तेवढं अन्य कोणत्या राज्यात झालं नाही, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.
जदयू मुख्यालय स्थित कर्पूरी सभागार में राज्य कार्यकारिणी एवं राज्य परिषद की बैठक का पहला दिन..! प्रदेश अध्यक्ष श्री @BashisthaNarain की अध्यक्षता में मुख्यमंत्री श्री @NitishKumar, राष्ट्रीय अध्यक्ष श्री @RCP_Singh एवं अन्य वरिष्ठ नेताओं की गरिमामयी उपस्थिति..!! pic.twitter.com/dQmALMnjTf
— Janata Dal (United) (@Jduonline) January 9, 2021
- देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)