'ओ साहेब, बोला किती पैसे पाहिजेत तुम्हाला'; तरुणानं पोलिस उपनिरीक्षकाशी घातली हुज्जत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

तेथे बंदोबस्तासाठी असलेले नरळे यांनी त्याला मास्कबाबत विचारणा केली. तेव्हा भोसलेने कारवाईला विरोध केला. त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. नरळे यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.

पुणे : ''मी इथलाच आहे. तुम्हाला काय माझीच गाडी दिसते का? इथे असलेल्या सगळ्या गाड्यांवर कारवाई करायची. मी शूटिंग करणार आहे. तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा,'' असे मोठ-मोठ्याने बोलून पोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घालणा-या तरुणास विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप माणिक भोसले (वय 31, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पेट्रोल संपले की दुचाकी सोडून द्यायचा; पोलिसांनी चोरट्याकडून १० गाड्या केल्या जप्त​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षानिमित्त विश्रांतवाडीतील धानोरी भागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी (ता.31) रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरील सहप्रवासी भोसले मास्क न घालता भरत ढाब्याजवळ थांबला होता. त्यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेले नरळे यांनी त्याला मास्कबाबत विचारणा केली. तेव्हा भोसलेने कारवाईला विरोध केला. त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. नरळे यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police arrested a young man who opposed to action for not wearing a mask