
पोलिसांनी संशयावरून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्याच्याकडे पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तर दिली.
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरायचो. त्यातील पेट्रोल संपल्यानंतर त्या रस्त्यावरच सोडून देत असे. त्यानंतर पसार होत असल्याची कबुली चोरट्याने पोलिसांना दिली आहे. त्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अमिनूर वहाब मंडल (वय 27, रा. कपिल मल्हार सोसायटी, बाणेर, मूळ रा. कासीपूर, पश्चिम बंगाल ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
- Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज
मंडल बाणेरमधील धनकुडेवस्ती परिसरात थांबला होता. गस्त घालणारे पोलिस नाईक प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांनी त्याला पाहिले. पोलिसांनी संशयावरून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्याच्याकडे पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याने मौजमजेसाठी या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर संबंधित दुचाकी तो रस्त्यात सोडून पसार व्हायचा, अशी माहिती चतुशृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.
- Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी पार पडली कोरोनाची 'ड्राय रन'!
मंडल याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेवाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादा गायकवाड, मोहनदास जाधव, महेश भोसले, हवालदार दिनेश गंडाकुश, मुकुंद तारू, श्रीकांत वाघवले यांनी ही कारवाई केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)