Pune : आई बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार ओतूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

आईलाच ठार मारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपी मुलाला बेड्या
pune
punesakal

जुन्नर - येथील जन्म देणाऱ्या आईलाच जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व तिची बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

मंगेश विठ्ठल भोर, (वय ३०, रा. हिवरे बु. कैलासनगर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक मुलाचे नाव असून न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये विमल विठ्ठल भोर (वय. ६७ रा. हिवरे बु. कैलासनगर, ता. जुन्नर) या बेपत्ता झाल्याची तक्रार मुलगा मंगेश भोर याने ओतूर पोलिसात दिली. त्यानुसार पोलिस हवालदार महेश पटारे यांनी तपास करून ही महिला आळंदी येथे आढळून आली.

pune
Pune : दौंड येथे रेल्वेच्या रिकाम्या डब्ब्याला आग

त्याप्रमाणे मंगेश भोर याने ओतूर पोलिस ठाण्यात आई बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार नोंदवली असल्याचे निदर्शनास आले. त्या प्रमाणे विमल भोर यांचा जबाब नोंदवून ओतूर पोलिस ठाण्यात त्यांनी सांगितल्यावरून फिर्यादी जबाब नोंदविण्यात आला.

त्या प्रमाणे विविध कलमाअंतर्गत १५ जुलै २०२३ ला गुन्हा दाखल करून मंगेश विठ्ठल भोर(वय ३०, रा. हिवरे बु. कैलासनगर, ता. जुन्नर) यास अटक करून मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

pune
Pune Accident : शिवाई बसची कारला धडक देऊळगाव मही येथील युवकाचा मृत्यू

‘माचीस’मुळे वाचला जीव

विमल भोर यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, ‘‘मुलगा मंगेश भोर यास दारूचे व्यसन आहे. त्याचे लग्न होत नसल्याने त्याचेकडून सतत होणाऱ्या शिवीगाळ दमदाटी व मारहाणीला कंटाळून यापूर्वी तीन वेळेस घर सोडून निघून गेले होते.

pune
Pune Crime : जमिनीच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

१३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्याने बहीण सुनीता सुनील कुटे हिला फोन केला असता, तिने फोन कॉल उचलला नाही. या कारणावरून मला शिवीगाळ दमदाटी करून माझ्या पाठीत व कमरेवर लाथा मारून ‘तुला आज जिवंतच ठेवत नाही’, असे म्हणून जिवे मारण्याचे उद्देशाने त्याने नायलॉनचे दोरीने माझा डावा पाय व दोन्ही हात बांधले.

त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कॅनमधील डिझेल माझ्या डोक्यावर व अंगावर ओतून घरात माचीस सापडत नसल्याने घराच्या पुढच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून माचीस आणायला बाहेर गेला. त्या वेळी मी हाता-पायाला बांधलेली दोरी सोडून घराच्या मागच्या दरवाजावाटे पळून गेले. त्यामुळे मुलगा मंगेश याच्या भीतीमुळे आजपर्यंत आळंदी येथे राहते.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com