रागाच्या भरात घरातून बाहेर पडली, पुण्यातून निघाली अन् थेट पोहोचली आसामला!

Pune police brought back a woman who left house and reach at aasam
Pune police brought back a woman who left house and reach at aasam

पुणे : घरगुती वादामुळे रागाच्या भरात ती घर सोडून बाहेर पडली...तिने सोबत 3 वर्षाच्या मुलाला घेतले. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध करत अखेर पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केला असता, ती महिला आसाममध्ये पोहचल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात ही महिला एवढ्या लांब आसाममध्ये पोहचली कशी? असा प्रश्न पुणे पोलिसांसमोर उभा राहीला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील वारजे येथे राहणारी 30 वर्षीय नोकरी करणारी महिला घरात भांडण झाले म्हणून रागाच्या भरात 3 वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर पडली. दरमान्य, घरातील लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. 8 जुनला वारजे पोलिस ठाण्यात महिला हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. महिलेचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर लोकेशन आसाममधील असल्याचे समजले.  पुणे पोलिसांना ताताडीने करीमगंज पोलिसांना संपर्क साधला आणि माहिती कळवली. तेथील पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेऊवन मुलासह 14 जुनला ताब्यात घेतले. ''भांडणामुळे रागाच्या भरात घराबाहेर पडले. पण राग शांत झाल्यावर मी घरी परत येणार होते.'' असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले. 

महिला सापडल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक श्रीधर खडके, पोलिस शिपाई भांडवलकर तातडीने आसामला गेले. त्या महिलेला मुलासह ताब्यात घेऊन पुण्यात आणले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 

जुन्नरची सुरु होती कोरोनामुक्तीकडे वाटचाल पण...

देशभर लॉकडाऊन सुरु असताना, पोलिस बंदोबस्त असताना पुण्याहून आसामला चारचाकीने ही महिला कशी पोहचली असा प्रश्न पोलिस प्रशासना समोर निर्माण झाला आहे. वाटेत या महिलेला कोणीच अडविले नाही का? दरम्यान, महिलेची मानसिक स्थिती योग्य नसल्याने याबाबत चौकशी करता आली नाही, पण एवढ्या लांब जाऊनही महिला सुखरुप परत घरी आली हे महत्वाचे असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अश्विनी चांदगुडे यांनी सांगितले.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com