
Pune Delivery Boy Marathi News: ‘डिलिव्हरी बॉय’चे कपडे परिधान करून शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळीतील दोघा सराइतांसह एका सराफ व्यावसायिकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दीडशे हिरे, ८६ तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, दुचाकी आणि दोन पिस्तूल असा सुमारे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींपैकी दोघे जण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतच्या (मकोका) गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर काही महिन्यांपासून घरफोड्या करीत होते.