Pune Police : पुण्यात पाच नवीन पोलिस ठाण्यांची घोषणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis : पुण्यात पाच नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी आणि १००० पोलिसांच्या नव्या मनुष्यबळाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Pune Police
Pune PoliceSakal
Updated on

पुणे : ‘‘पुणे पोलिसांनी आम्‍हाला सात नव्‍या पोलिस ठाण्यांचा प्रस्‍ताव दिला होता व आम्‍ही तो विनाविलंब मंजूर केला. सोबत ८०० पोलिसांचे मनुष्यबळही मंजूर केले. आता पुन्‍हा नवीन पाच पोलिस ठाण्‍यांची मागणी केली आहे. त्‍यानुसार लोहगाव लक्ष्‍मीनगर (येरवडा), येवलेवाडी (कोंढवा), मांजरी व नऱ्हे येथे पाच नवीन पोलिस ठाणी तयार करण्‍यात येतील व हजार पोलिसांचे मनुष्यबळ देण्‍यात येईल,’’ अशी घोषणा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्‍यात केली. पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‍घाटन व भूमिपूजनप्रसंगी शिवाजीनगर पोलिस मुख्‍यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com