esakal | ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त!

बोलून बातमी शोधा

Ransom_case

अडसूळ याने गुन्ह्यातील 54 लाख त्याच्या खात्यात जमा केल्यानंतर ते वेळोवेळी काढून घेतले. तर काही रक्कम इतर खातेदारांना विविध माध्यमातून पाठवले आहेत.

ऍट्रोसिटीची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या अडसूळकडून 34 लाख जप्त!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत डॉक्‍टरकडून 75 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणातील आरोपी मनोज अडसूळ याच्याकडून 33 लाख 98 हजार रुपये जप्त करण्यात खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या प्रकरणात डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय 69, रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा डॉ. साहिल यांच्याविरुद्ध एका महिलेने ऑक्‍टोबर 2019 रोजी विनयभंगाची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणात अडसूळ याने तुमच्या मुलावर बलात्कार, ऍट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी भीती फिर्यादी यांना दाखवली. त्या आधारे फिर्यादींकडून 75 लाख रुपये खंडणी घेतली.

- कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

अडसूळ याने गुन्ह्यातील 54 लाख त्याच्या खात्यात जमा केल्यानंतर ते वेळोवेळी काढून घेतले. तर काही रक्कम इतर खातेदारांना विविध माध्यमातून पाठवले आहेत. त्यामुळे सहा जणांचे बॅंक खाती गोठविण्यात आली आहेत. त्या खात्यात 12 लाख 81 हजार रुपये शिल्लक आहेत. तर 21 लाख रुपयांची रोखीने विल्हेवाट लावल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

- Nirbhaya Case : अखेर निर्भयाचे दोषी फासावर लटकणार, आता 'ही' तारीख!

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने अडसूळ याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. अडसूळ आणि याच प्रकरणातील दुस-या गुन्ह्यातील आरोपी जयेश कासट यांनी फिर्यादी यांच्या मुलाला भेटून या प्रकरणाचा समझोता केला आहे. त्यांच्याच नेमकी काय चर्चा झाली? याचा आरोपीकडे तपास करायचा आहे, यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ऍड. विजयसिंह जाधव यांनी केली होती.

- 'मी ब्राह्मण नसूनही मला...'; तेजश्री प्रधान म्हणते...

त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी अडसुळची नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस उप निरीक्षक संजय जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.