महिलांच्या सुरक्षेबाबत 'कोई शक'? आयुक्त गुप्तांचा पुणेकरांशी मनमोकळा संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या सुरक्षेबाबत 'कोई शक'? आयुक्त गुप्तांचा पुणेकरांशी मनमोकळा संवाद

महिलांच्या सुरक्षेबाबत 'कोई शक'? आयुक्त गुप्तांचा पुणेकरांशी मनमोकळा संवाद

पुणे : ट्विटरवरील व्हिडीओ, छायाचित्रांद्वारे पुणेकरांचे पोलिसांशी भावनिक नाते जोडणाऱ्या पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यापुढे जात थेट इन्स्टाग्रामवर "आस्क मी एनिथींग' असे सांगत पुणेकरांशी संवाद साधला. महिलांना गरज भासल्यास पोलिस खरोखरच मदत करतात का, या प्रश्‍नावर "कोई शक, जर तुम्हाला तसा अनुभव आला नसेल, तर मी तुमचे एकेल, महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे कधीही खपवून घेतले जाणार नाही', अशा शब्दात पोलिस आयुक्तांनी महिलांना खंबीर विश्‍वास दिला.

केवळ तेवढ्यावरच न थांबता महिलांना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यांसह संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये जरबही बसल्याचे चित्र आहे. असे असतानाच पोलिस आयुक्तांनी काही दिवसांपुर्वी ट्विटरद्वारे पोलिसांकडून रात्रंदिवस सुरू असलेल्या बंदोबस्ताकडे लक्ष वेधले. विशेषतः संचारबंदी असतानाही नागरीक पोलिासांना कशा पद्धतीने भन्नाट कारणे सांगून घराबाहेर पडतात, याचे व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत राहीले. त्याचबरोबर ट्विटरवरील काही संवाद, छायाचित्रांना देखील लाखो पुणेकरांनी पसंत केले.

हेही वाचा: पुण्यात लष्कर परिसरात भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाचा खून

ट्विटरनंतर पोलिस आयुक्तांनी इन्स्टाग्रामाद्वारे नागरीकांशी संवाद साधण्यास प्राधान्य दिले. मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस त्यांनी इन्स्टाग्रामवर नागरीकांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या प्रश्‍नांना नर्मविनोदी शैलीत उत्तरे दिली. तर महिला सुरक्षिततेच्या संदर्भात त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. 9 हजार 786 लोकांनी त्यांच्या "आस्क मी एनिथींग'ला प्रतिसाद दिला. त्यांचा हा कार्यक्रम 7 हजार 850 पेक्षा जास्त नागरीकांच्या पसंतीस पडला. तर 250 हून अधिक नागरीकांनी प्रश्‍न विचारले, त्यापैकी 25 ते 30 प्रश्‍नांना गुप्ता यांनी समर्पक उत्तरे दिली.सायबर फसवणूक, वाढती गुन्हेगारी अशा संदर्भात नागरीकांचे प्रश्‍न होते.

महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नाबाबत "महिला सुरक्षिततेबाबत तुम्हाला शंका आहे का? जर तुम्हाला तसा अनुभव आला असेल, तर थेट मीच तुमचे कान होईल. महिलांच्या सुरक्षिततेकडे दुलर्क्ष खपवुन घेतले जात नाही.' असे उत्तर त्यांनी दिले. "सावत्र आईने केलेल्या मानसिक छळाचा कसा सामना करू', या प्रश्‍नालाही आयुक्तांनी आम्ही कायदेशीर मार्गाने मदत करु शकतो, परंतु वाईट अनुभव आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा' अशा शब्दात तरुणीला त्यांनी विश्‍वास दिला. तर "सध्याच्या काळात सकारात्मक कसे राहायचे' या प्रश्‍नालाही त्यांनी समपर्क उत्तर दिले. "वाचन करा, खेळ खेळा, जुने मित्र-कुटुंबीयांशी संवाद साधा, काहीतरी नवीन शिका. घरी राहून पॉपकॉर्न खात चित्रपटांचा आस्वाद घ्या'' असेही त्यांनी उत्तर दिले.

Web Title: Pune Police Commissioner Amitabh Gupta Open Dialogue With Punekars On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..