

Pune budhwar Peth Police Raid
sakal
पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लगाम घालण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर मध्यरात्री कोंम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत ४१ इमारतींची झडती घेण्यात आली, तर शेकडो महिला-पुरुषांची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बांगलादेशी महिला आणि काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर, अमली पदार्थासह एकाला अटक करण्यात आली.