
Bribery Case
Sakal
पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोंढव्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यास अटक केली. न्यायालयाने त्या पोलिस कर्मचाऱ्यास मंगळवारी (ता. १४) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.