दारुच्या नशेत कॉन्स्टेबलच्या कारची सहा गाड्यांना धडक, ना अटक, ना वैद्यकीय तपासणी; पुणे पोलिसांच्या भूमिकेवर सवाल

Pune Crime News : पुण्यात पोलीस हवालदारानेच दारुच्या नशेत भरधाव कार चालवत सहा गाड्यांना धडक दिलीय. यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
Drunk Pune Police Constable Crashes Into Six Cars, No Arrest Made

Drunk Pune Police Constable Crashes Into Six Cars, No Arrest Made

Esakal

Updated on

पुण्यात दारुच्या नशेत कार चालवत पोलीस हवालदारानेच सहा गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलीय. यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र या प्रकरणी अजूनही पोलिसांना अटक न केल्यानं पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस हवालदाराची वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात न आल्यानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होत आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आता व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com