

Pune Police Intensify Action Against Mule Accounts Special Cyber Crime Drive Leads to Over 100 Cases in Eight Days
sakal
पुणे : सायबर गुन्हेगारांकडून गरीब खातेदारांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांत फसवणुकीची रक्कम वर्ग केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या ‘म्युल अकाउंट्स’चा वापर करून देशभरात कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असून, पुणे पोलिसांनी अशा खातेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील आठ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अशा स्वरूपाचे १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.