Pune: पुणेकरांनो सावधान…! ड्रोन उडवाल तर होईल कारवाई; पोलिसांकडून ड्रोनसह पॅराग्लिडिंग, हॉट एयर बलून उडवण्यावर बंदी
Pune Drone Flying Ban: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ड्रोन उडवण्यास बंदी घातली आहे. पुण्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नियम मोडला तर पोलीस कारवाई करणार आहेत.
पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात ड्रोन आणि इतर उडत्या यंत्रांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ६ एप्रिल २०२५ पासून ते ५ मे २०२५ पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहे.