Pune Police Crack Down on Drug Trafficking Network
पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पिंपरी भागात एका सदनिकेवर छापा टाकून तेथून हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पथकाने पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात कारवाई केली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईत मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडीसह वेगवेगळ्या प्रकारचे साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.