

Pune Police, Academia Partner to Combat Student Crime
Sakal
पुणे : अमली पदार्थांचे सेवन आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनासह विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिस आता शिक्षण संस्थांबरोबर पुढील वर्षभर काम करणार आहेत. त्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आराखडा तयार करण्यात आला असून, या निमित्ताने शिक्षण संस्थांमध्ये पोलिसांचा वावर राहणार आहे. त्याचा आराखडा पोलिसांनी केला असून त्याची माहिती पोलिसांनी बुधवारी (ता. १९) दिली.