
nilesh-ghaywal and gaja marane
esakal
पुण्यात स्वयंघोषित गुंडांचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. शहरातील गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंदेकर टोळी, निलेश घायवळ गँग यांच्या कारवाया आपण पाहिल्या आहेत. सामान्य नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. गोळीबार, कोयत्याने वार करणे हे या गुंडांसाठी आता सामान्य झाले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे “आर्थिक ऑडिट” करण्यात येणार आहे.