esakal | पुणे : पोलिसांच्या तत्परतेने झाली माय लेकरांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

police

पुणे : पोलिसांच्या तत्परतेने झाली माय लेकरांची भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : बसमध्ये बसून आलेल्या वाट चुकलेल्या मुकबधीर मुलीला पोलिस व पीएमपीएलच्या कर्मचा-यांच्या तत्परतेने पुन्हा कुटूंबाच्या सुखरुप हवाली करण्यात यश आले.

गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात कर्वेनगर वरुन हडपसर मध्ये निघालेल्या बसमध्ये एक सहा वर्षाची मुलगी बसली. चालकाने चौकशी केली असता तीला बोलता येत नसल्याचे व तीच्या सोबत सुध्दा कोणीही नसल्याचे लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने कोथरुड बस स्थानकावर असलेल्या पीएमपीएलच्या कर्मचा-यांकडे या मुलीला सोपवत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

तेथील कर्मचा-यांनी शंभर नंबरला फोन करुन कळवताच एरंडवणा मार्शल ज्ञानेश्वर पांचाळ व जयराम भोजने तेथे पोहचले. मुलीला बोलता येत नसल्याने मुलीचा पत्ता शोधणे अवघड होते. बस ज्या मार्गे आली त्याच भागातील ही मुलगी असावी असा विचार करत मार्शलनी पेट्रोलिंग सुरु केले असता एक महिला धायमोकलून रडत येताना दिसली. चौकशी केली असता या महिलेचीच ही मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.

कर्वेनगर मधील वडार वसाहत, साईबाबा मंदिराजवळ राहणा-या रहीनाज वसीम नायक यांनी आपली मुलगी अक्सा हीला पाहताच प्रेमाने जवळ घेत अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. तोपर्यंत नायक कुटूंबीयातील इतर सदस्यही कोथरुड स्टँडला पोहचले होते. पीएमपीएलचे कर्मचारी व पोलिसांच्या तत्परतेमुळे आपली मुलगी परत मिळाल्याचे समाधान कुटूंबीयांनी व्यक्त केले.

loading image
go to top