विनामास्क फिरणारे नागरिक पोलिसांच्या रडारवर; आठवडाभरात 'इतक्या' पुणेकरांवर झाली कारवाई

Pune_Police
Pune_Police

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तरीही बेफिकिरीने वागत मास्कचा उपयोग न करणारे नागरिक पोलिसांच्या रडारवर आहेत. विनामास्क किंवा ते न वापरणाऱ्या 15 हजार 206 पुणेकरांवर गेल्या सात दिवसांत पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा फैलाव संपुष्टात येईपर्यंत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करीत मास्कशिवाय किंवा त्याचा वापर न करणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येत आहे. पोलिसांनी दोन ते आठ सप्टेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत 76 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्कबाबतची कारवाई करण्यासाठी सध्या शहरात चौकाचौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

एकाच ठिकाणी सहा-सात पोलिस असतात. त्यांना पाहताच चारचाकी वाहनचालक देखील आपले मास्क शोधत असल्याचे प्रकार रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. मास्कसह वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल, तर संबंधितांना दुहेरी दंड केला जात आहे. काही ठिकाणी तर पोलिस अगदी गल्लोगल्ली जाऊन कारवाई करीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांत हुज्जत होत आहे. दंडावरून झालेल्या वादातून मंगळवारी दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि सतत हात धुणे आवश्‍यक आहे. मास्क न घालणाऱ्यांवर दोन तारखेपासून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करने नसून मास्कबाबत असलेली जागरूकता वाढविणे आहे. कोविड-19 पासून बचाव होण्यासाठी पुणेकरांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा)

ऑफिसला जाण्यासाठी मी मंगळवारी कारमधून जात होतो. मी मास्क लावला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मला थांबवून दंड वसूल केला. कारमध्ये चालक एकटाच असेल आणि गाडीच्या काचा बंद असतील, तर त्यांना दंड करू नये.
- अशोक राऊत, नोकरदार

- मास्क न वापरणाऱ्या 15 हजार 206 पुणेकरांवर कारवाई
- 76 लाख 3 हजार रुपयांचा दंड केला वसूल
- कारवाईसाठी शहरातील प्रमुख चौकांत पोलिस तैनात
- मास्कसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रडारवर
- गल्लोगल्ली जाऊन होतेय कारवाई
- कारवाईवरून पोलिस व नागरिकांत होताय वाद

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com