

Pune Police Announce Strict Ganeshotsav Guidelines; Laser and Plasma Lights Banned During Immersion Processions
ESakal
गणेशोत्सवासह आगामी सण आणि शहरात होणाऱ्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे कलम ३७ १४ दिवसांसाठी लागू राहील. हा आदेश संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:०१ पासून ते १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:०० पर्यंत लागू राहील. हा आदेश महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३७ (१), (२) आणि (३) अंतर्गत जारी करण्यात आला आहे.