
पुणे शहरात कार्यक्रमांदरम्यान आकाशात बीम वा लेझर प्रकाशझोत सोडण्यास दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आदेश मोडणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कारवाई होईल, असा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.