

Pune Police officer Mansing Patil transferred after controversy
esakal
अल्पवयीन आरोपीची सार्वजनिकरित्या धिंड काढल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची अखेर विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.