Pune Police Crack Kidnapping Case Involving Minor Girls
पुणे : शहरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना काळेपडळ पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. गुन्हे शाखा आणि काळेपडळ पोलिसांनी सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आरोपींचा शोध घेत दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोघा आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.