Pune Police officer End Life : पोलीस अधिकाऱ्याने लॉजवर संपवले जीवन, पुण्यात धक्कादायक घटना
Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केली. मृत अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे असून ते सांगली पोलीस दलात तासगाव येथे कार्यरत होते. गुडघ्याच्या आजारावर उपचारासाठी ते पुण्यात आले होते .
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने पुण्यातील एका लॉज मध्ये विष पिऊन जीवन संपवले आहे.शारीरिक व्याधीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, पोलिसांची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे.