

Pune police comment on gangsters sparks debate later clarified
Esakal
पुण्यात एका सामाजिक कार्यक्रमात पुणे पोलीस उपायुक्तांनी केलेल्या विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचं आश्वासन देताना पुणे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी भाईला बाई करू असं विधान केलं. आपण केलेल्या विधानाची जाणीव होताच त्यांनी सावरून घेतलं. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्यांची सुटका करून त्यांचे समुपदेशन करण्यासही कृषिकेश रावले यांनी सांगितलं.