Pune: जमावबंदीचे आदेश जिल्ह्यात लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमावबंदी

पुणे : जमावबंदीचे आदेश जिल्ह्यात लागू

पुणे : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे प्रतिसाद राज्यात विविध ठिकाणी उमटले असून काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. याचा फायदा घेऊन पुणे जिल्ह्यामध्ये काही समाजकंटक सोशल माध्यमांचा वापर करून दोन समाजात किंवा गटातटात तेढ निर्माण करण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देखमुख यांनी रविवारपासून ग्रामीण भागात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी रझा अकादमीने शुक्रवारी (ता. १२)पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले. यामध्ये अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

काय आहे आदेश?...

कोणीही इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांवर जातीय तणाव निर्माण करणारी माहिती पसरवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास किंवा शेअर केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ॲडमिनवर असणार आहे. समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती अथवा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे, शस्त्र, लाठी-काठी वापरण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्‍स बोर्ड लावणे किंवा त्या प्रकारच्या घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

loading image
go to top