Pune Drugs Party: हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी, पुण्यात दोन जणांना अटक

FC Road Drugs Party: यावेळी पोलीस अटक केलेल्यांकडून ही पार्टी कोणी आयोजीत केली होती? यामध्ये कोणी ड्रग्ज पुरवले? आणि ड्रग पेडलर्स कोण होते? याची माहिती घेत आहेत.
Pune Drugs Party
Pune Drugs PartyEsakal
Updated on

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे मोठ्या मान खाली घालावी लागत आहेत. आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आले आहे. येथील एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दाखवले होते. याची दखल घेत पुणे पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे.

Pune Drugs Party
Pune Drug Case: पुण्याचा उडता पंजाब! पोर्शे कार प्रकरणानंतर एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या परिसरात आता विविध पथके दाखल होत असून, पोलिसांनी आतापर्यंत 2 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये हॉटेलचा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याचा समावेश आहे. संबंधित हॉटेपासून अवघ्या काही अंतरावर शिवजीनगर पोलीस ठाणे आहे. तेथे पोलीस अटक केलेल्यांची चौकशी करत आहेत.

यावेळी पोलीस अटक केलेल्यांकडून ही पार्टी कोणी आयोजीत केली होती? यामध्ये कोणी ड्रग्ज पुरवले? आणि ड्रग पेडलर्स कोण होते? याची माहिती घेत आहेत.

Pune Drugs Party
Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? पोलिसांचे निलंबन होणार?

दरम्यान पार्टीसाठी ड्रग्ज पुरवणाऱ्या ड्रग पेडलरची माहिती हॉटेल व्यवस्थापकाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थापकाची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात येत आहे.

या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण गेल्या काही काळात याच विभागावर विरोधकांनी आरोप केले होते. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चरणसिंह राजपूतही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Manwat Drug Case Police Arrest Six More As MD Drug Racket Investigation Expands Across Latur Parli And Kalamb
Drug Racket
Pune Police Intensify Drug Crackdown 162 NDPS Cases 283 Arrested Rs 11.28 Crore Drugs Seized
Drug abuse suspected in Baner service road
Marathi News Esakal
www.esakal.com