

maharashtra police
esakal
Pune Latest News: आपल्या सख्या भावाला पोलिसाची वर्दी मिळवून देण्यासाठी एका पोलिस उपनिरीक्षकाने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील कथेप्रमाणे ‘डमी’ पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या उपनिरीक्षकाने २०१६ मध्ये झालेल्या परिक्षेत भावाच्या जागी स्वतःच लेखी परीक्षा दिली. नऊ वर्षांनी त्याच्या हा फसवेपणा उघडकीस आला असून त्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.