Pune Police Recruitment Stampede : पुण्यात महिला कारागृह पोलीस भरतीदरम्यान गोंधळ उडाला आहे. यावेळी लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या. या गोंधळात अनेक मुली जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेची तयारी व्यवस्थित नसल्याने हा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं आहे.