

Pune rural police recruitment traffic diversion update
sakal
पुणे : पोलिस भरती प्रक्रियेनिमित्त पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात आले असून, दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा या वेळेत अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता बुधवार (ता. ११) पासून येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.