esakal | पुणे पोलिसांकडून अखेर अडीच वर्षांनी गुन्हा दाखल; मुंढवा हॉटेल गोळीबार प्रकरण

बोलून बातमी शोधा

Crime_Firing}

या गोळीबाराच्या घटनेमुळे हॉटेलच्या भागीदाराने त्यावेळी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी हॉटेल वायकीकीमध्ये घडलेल्या त्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांकडून अखेर अडीच वर्षांनी गुन्हा दाखल; मुंढवा हॉटेल गोळीबार प्रकरण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंढवा येथील एका हॉटेलमध्ये सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत संबंधीत गुंडाविरुद्ध गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाकडून तब्बल अडीच वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून जुनी प्रकरणे शोधून सराईत गुंडांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागल्याची चिन्हे आहे. 

सचिन पोटे असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोटे आणि त्याचा साथीदार गुंड अजय शिंदे यांच्याविरुद्ध क्रिकेट बेटींगमध्ये सहभागी झालेल्यांकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात 10 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी शिंदे यास अटक केली. तर पोटे हा गुंड गणेश मारणेच्या टोळीतील गुंड असून तो अजूनही फरारी आहे.

धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात जामीनावर सुटलेल्या आरोपीने पीडितेला जिवंत जाळले​

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोटे याने 15 जून 2018 या दिवशी मुंढव्यातील हॉटेल वायकीकीमध्ये एका व्यक्तीवर पिस्तुलातून चार गोळ्या झाडून, हॉटेलची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. पोटे हा त्याच्या साथीदारांसमवेत संबंधीत हॉटेलमध्ये पार्टीसाठी आला होता, त्याचबरोबर येरवड्यातील एक व्यक्ती त्याच्या साथीदारांसमवेत त्याच हॉटेलमध्ये पार्टीसाठी आली होती.

हॉटेलच्या भागीदाराकडून लाऊड स्पिकरवर त्या व्यक्तीचे नाव सातत्याने घेतले जात होते. या प्रकारामुळे पोटेचा अहंकार दुखावला गेल्याने त्याने त्या व्यक्तीवर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या होत्या. तर त्याच्या साथीदारांनी हॉटेलची तोडफोड केली होती. याबरोबरच त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डिव्हीआर मशीनही चोरुन नेले होते.

तब्बल 16 महिन्यांनंतर मोदींचा परदेश दौरा; कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार देशाबाहेर​

या गोळीबाराच्या घटनेमुळे हॉटेलच्या भागीदाराने त्यावेळी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. त्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी हॉटेल वायकीकीमध्ये घडलेल्या त्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत घटनेत पोटे आणि त्याच्या तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून उर्वरीत साथीदारांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करण्याच्यादृष्टीने पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनीट चारकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल आणि त्यांच्या पथकाकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)