

pune police
esakal
पुणे, ता. १४: शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळांची आणि पाच नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.